राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत


ठाणे दि. 26- राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जातींच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. सन 2019-20 मध्ये परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळावयाच्या परदेश शिष्यवृत्ती निवडीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जातीच्या परदेशात शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in किंवा http://sjsa.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर भेट द्यावी अथवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पाचवा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय इमारत, कोर्ट नाका, ठाणे येथे संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे यांनी केले आहे.
00000000

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न