146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघातील निवडणूक यंत्रणा सज्ज- निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सतिष बागल
ठाणे दि.22 (जिमाका ) :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला
असून जिल्ह्यात दि.21 सप्टेंबर पासुन आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक यंत्रणा
सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री.सतिष बागल यांनी दिली.
निवडणुकीची
अधिसूचना दि. २७ सप्टेंबर रोजी जाहीर
होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख दि. ४ ऑक्टोबर आहे. अर्जांची छाननी
दि.५ ऑक्टोबर रोजी तर उमेदवारी अर्ज मागे
घेण्याची मुदत ७ ऑक्टोबर आहे. २१ ऑक्टोबरला मतदान व दि.
२४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे या विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी डॉ बाबासाहेब
आंबेडकर भवन पोखरण रोड नं 2 ठाणे येथे
होणार आहे.
146 ओवळा
माजिवडा विधानसभा मतदार संघात एकूण 430 मतदान
केंद्रा पैकी मतदान केंद्र क्रमांक 377 व 378हे दोन महिला
मतदान केंद्र असणार आहेत. या मतदारसंघात 2,43, 815 पुरुष मतदार
2,03
,704 स्त्री मतदार 11 इतर मतदार असे 4,47,530 एकूण मतदार
आहेत दिनांक 31 ऑगस्ट च्या अंतिम यादीतील
ही मतदार संख्या आहे.या मतदारसंघात 3,92 ,171 फोटो मतदार
तर 3,96
,378 ईपीक मतदार आहेत.
430 मतदान केंद्राच्या पैकी 391 तळमजल्यावर तर 91 पहिल्या मजल्यावर आहेत.
पहिल्या मजल्या साठी लिफ्ट ची सोय आहे. या मतदारसंघात एकूण 803 दिव्यांग मतदार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत
पार पाडण्यासाठी 2838 अधिकारी व कर्मचारी यांची
आवश्यकता आहे.
निवडणूकीत
प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपले
नाव मतदार यादीत असल्याची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. तरी सर्व मतदारांनी १९५०
या टोल फ्री क्रमाकांवर संपर्क साधून आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून
घ्यावी असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी श्री.सतिष बागल यांनी मतदारांना केले
आहे.
Comments
Post a Comment