ठाणे जिल्ह्यात खताचा तुटवडा नाही
ठाणे जिल्ह्यात खताचा तुटवडा नाही
ठाणे
दि.4 (जिमाका):ठाणे जिल्हयात
भाताची लागवड जास्त असल्याने सन 2019-20 या वर्षाकरीता ठाणे
जिल्हासाठी एकूण 13290 मे टन युरीया खताची मागणी मंजुर झाली आहे.एकुण
13290 मे टन युरिया खताच्या मागणी पैकी ठाणे जिल्हृयात आज अखेर राष्ट्रीय केमिकल्स
ॲन्ड फर्टीलायझर्स मार्फत 7228.22 मे.टन कृभको मार्फत 360 मे.टन आणि झुआरी मार्फत
78 में टन असा एकुण 7666.22 मे.टन युरिया
खताचा पुरवठा वितरणाकडे झाला आहे.
शेतकऱ्यांना
100 टक्के युरीया खत पुरवठयाचे नियोजन करण्यात
आले आहे.तसेच सुफला या खताचा पुरवठा वितरकांकडे झाला आहे.जिल्हात खताचा
साठा पुरेसा आहे.शेतकऱ्यांनी युरीया तुटवडयाबाबतीत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू
नये. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी
अंकुश माने व कृषी विकास अधिकारी मनोजकुमार ढगे यांचेकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment