जिल्ह्यातील मतदानकेंद्रे तळमजल्यावर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार अमंलबजावणी --जिल्हाधिकरी राजेश नार्वेकर
ठाणे दि.16 -मतदानाचा
हक्क बजावतांना मतदारांना कोणतीही अडचण होऊ नये तसेच त्यांना सुलभ रित्या मतदार
केद्रे उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हातील जी मतदान केंद्रे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, मजल्यावर
होती अशी सर्व मतदार केंद्रे तळमजल्यावर येणार असल्याची माहिती जिल्हाधिकरी तथा
जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वमुमीवर भारत निवडणूक आयोगाने
निवडणूक प्रकिया सुलभ सुरळीत पणे राबण्यासाठी मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्याचे
निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात 18 विधानसभा
मतदारसंघ आहेत.या सर्व मतदारसंघामध्ये या निर्देशाची तातडीने अमंलबजावणी करण्यात
आली आहे.
जिल्ह्यात एकूण 6621 मतदान केंद्रे असुन लिफ्ट सुविधासह असलेले 251 मतदान केंद्रे वगळता 6370 मतदान केंद्रे तळमजळयावर
असणार आहेत. या पैकी 5508 ही मतदान केद्रे तळमजल्यावर 862
मतदान केंद्रे मंडपामध्ये असणार आहेत. लिफ्ट असलेल्या 251 मतदार केद्रामध्ये बॅटरी बॅक्अप व्यवस्था करण्यात येणार आहे.मतदाराना
कोणतीही अडचण येणार नाही. याची काळजी घेण्यात येत असल्याचे श्री नार्वेकर यांनी
सांगितले.
निवडणूक आयोगाच्या सुधारीत निर्देशानुसार ज्या ठिकाणी मतदार
संख्या 1500 असतील अशा त्या ठिकाणी सहाय्यकारी मतदान केंद्रे असणार आहेत.विधानसभा निवडणूक 2019 साठी 133 सहाय्यकारी मतदानकेंद्रे असुन जिल्ह्यात
एकूण 6621 मतदान केंद्रे असणार आहेत.
मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातुन
जिल्हामध्ये 1 लाख 5 हजार
सहाशे दहा नवीन
मतदारांची नोंदणी झाली आहे. 31 ऑगस्ट
अखेर पर्यंत 63 लाख 29 हजार 385
मतदार असुन त्याचे प्रमाण लोकसंख्येच्या 73.73 टक्के आहे.जिल्ह्यामध्ये निवडणूकीसाठी 11592 ईव्हीएमची
आवश्यकता आहे.सदयस्थितीत 12244 EVM 8734 CU आणि 9384
VVPAT उपलब्ध
आहेत.केंद्रशासनाच्या सेंट्रल वेअर हाऊस तुर्भे येथिल गोडाऊन मध्ये मशिन ठेवण्यात
आल्या आहेत.
विधानसभा 2019 च्या निवडणूकीत प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजवण्यासाठी आपले नाव मतदार
यादीत असल्याची खातरजमा करुन घेणे आवश्यक आहे तरी सर्व मतदारानी 1950 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधून आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री
करुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले .
जिल्हामध्ये
सर्व मतदार संघामध्ये जनजागृती करण्यासाठी स्वीप कार्यक्रमाची अमलबंजावणी करण्यात
येत आहे. विधानसभा 2019 च्या
निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून सर्व पुर्व तयारी झाली असल्याचे जिल्हाधिकारी
यांनी सांगितले.
Comments
Post a Comment