ठाणे शहरात गणपती विसर्जनसाठी वाहतूक मार्गात बदल



ठाणे दि.5(जिमाका):ठाणे शहरात गणेश मुर्ती विसर्जनाच्या दिवशी  दि.6.सप्टेंबर 2019 (पाच दिवसांचे) दि .8 सप्टेंबर 2019 (सात दिवसाचे) दि.12 सप्टेंबर.2019(अंनत चर्तुदशी) या कालावधीत वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव व वर्तकनगर येथील उपवन तलाव या ठिकाणी  पोखरण नं 1 व 2 भागातील,तसेच मुंबई उपनगर परिसरातील गणेश मुर्तीचे विसर्जन मोठया प्रमाणात ठाणे शहरात केले जाते.त्या करिता वाहतूक सुरळीत व सुनिश्चित रहावी यासाठी मोटार वाहन कायदा कलम 115,116,(1)(अ)(ब) अन्वये वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत.
प्रवेश बंद-मॉडेला चेक नाका येथून रोड नं.16 व वागळे इस्टेट विभागाकडे जाणाऱ्या टी.एम.टी बसेससह सर्व प्रकारच्या वाहनांना सिंधुदुर्ग हॉटेल येथुन मुख्य रस्त्याने(स.गो.बर्वे मार्गाने) जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे.पर्यायी मार्ग-सदरची सर्व वाहने मॉडेल नाका येथुन रोड नं16 व वागळे इस्टेट विभागाकडे जाणारी वाहने सिंधुदुर्ग हॉटेल येथे डावीकडे वळून जगदाळे ट्रान्सपोर्ट येथे उजवीकडे वळून शांताराम चव्हाण  मार्गाने एम.आय.डी.सी ऑफिस येथे डावीकडे वळून मुख्य रस्त्याने (स.गो बर्वे मार्गाने) पुढे इच्छीत स्थळी जातील.
प्रवेश बंद-वागळे इस्टेट,रोड नं.16 कडून मॉडेल नाक्याकडे जाणाऱ्या टि.एम.टी बसेससइ सर्व प्रकारच्या वाहनांना रोड नं 16 पेट्राल पंप येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.पर्यायी मार्ग- सदरची वाहने वागळे इस्टेट व रोड व रोड नं.16 कडून मॉडेल नाका मुंबईकडे जाणारी वाहने रोड नं 16 येथून डावीकडे वळुनॲग्रीकल्चर ऑफिस-ब्राडमा कंपनी –कामगार हॉस्पीटल समोरुन-ई.एस.आय.एस.हॉस्पीटल रोडने नितीन जंक्शन मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद-बेस्ट बसेस मॉडेला चेक मार्गे तिनहात नाका येथे वळण घेवून जाणाऱ्या बसेसना मॉडेला चेक नाका येथे प्रवेश बंद करण्यात  येत आहे.पर्यायी मार्ग-सदरच्या बसेस मुलुंड चेक नाका येथेच प्रवासी उतरवतील व तेथेूनच प्रवासी घेवून परत मुंबईकडे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद- देवदयानगर नाका,कॉस येथून उपवन तलावाकडे जाणाऱ्या टि.एम.टी.बसेससह सर्व प्रकारच्या वाहनांना येऊर गेटपर्यंत प्रवेश बंद असुन त्यापुढे मुख्य दुतर्फा रस्त्याने उपवन तलावाकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे.पर्यायी मार्ग- देवदयानगर कॉस नाका येथून उपवन तलाव गावंडबाग नं.2 विभागाकडे जाणारी वाहने मत्रांजली बंगला-निलकंठ हाईटस मार्गे मुख्य रस्त्याने पुढे  इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद-कृत्रिम उपवन तलाव पायलादेवी मंदिर प्रवेशाद्वार गावंडबाग कडून येऊर गावाकडे उपवन मार्गे जाणाऱ्या दुतर्फा रस्त्याने टीएमटी बसेससह सर्व वाहनोना प्रवेश बंद करण्यात येत आहे.पर्यायी मार्ग-कृत्रिम उपवन तलाव पायलादेवी मंदिर प्रवेशद्वार गावंडबाग कडून येऊर गावाकडे जाणारी वाहने निळकंठ हाईटस मार्गे देवदयानगर नाका कॉस-शिवाईनगर सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.
       किसन नगर नं.3 येथील टी.एम.टी बस स्टॉप हा रोड नं. 22(गोल सर्कल)येथे तात्पुरता स्वरुपात देण्यात येत आहे.स.गो.बर्वे मार्ग,शांताराम चव्हाण मार्ग,रोड नं.22 सर्कल-इंदिरानगर नाका निमीन जंक्शन या रोडवर दोन्ही बाजुस सर्व प्रकारच्‍या वाहनांना पार्कींग करण्यास मनाई करण्यात येत आहे.दुपारी 2 वाजल्या पासुन गणेश मुर्ती विसर्जन कार्यक्रम संपे पर्यंत हे आदेश लागु राहतील.या अधिसुचनेतुन पोलिसांची वाहने,फायर ब्रिग्रेड,रुग्णवाहिका व अन्य अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे,असे पोलीस उप आयुक्त ,वाहतूक विभाग ठाणे शहर अमित काळे यांनी कळवले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ