5 फेब्रुवारी पर्यंत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
   ठाणे दि.28 जिमाका :महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्याची योजना कार्यन्वित आहे. यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार,  शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ( दिव्यांग खेळाडू) असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सन 2018 -2019 या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करावेत.
      या पुरस्कारासाठी ONLINE व ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येईल. संबंधितानी  ONLINE अर्जामध्ये आपल्या कामगिरीच्या तपशिलासह WWW.mumbaivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या लिंक वर अर्ज व संबंधित माहिती सादर करावी ONLINE भरलेल्या अर्जाची एक प्रत  स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रांसह अर्जदाराने संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात दि. 5 फेब्रुवारी, 2020 रोजी पर्यंत सदर करावे. तसेच ऑफलाईनद्वारे अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारांनी आपला अर्ज संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात दि. 5 फेब्रुवारी,2020 पर्यंत सदर करावे.
अधिक माहितीसाठी संकेतस्थळावर (www.maharashtra .gov.in)www.mumbaidivsports.com या वेबसाईट वर उपलब्ध आहे. किंवा क्रीडा व युवक सेवा संचानालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, संबंधित विभागाचे विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, अथवा संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क  साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न