१९ जानेवारी रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा



ठाणे दि. १६ जिमाका : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ (MAHATET) रविवार दि. १९ जानेवारी २०२० रोजी होणार आहे. त्याचबरोबर पेपर १ साठी ७५९० व पेपर २ साठी ५६६५ असे एकूण १३२५५ परीक्षार्थींची परीक्षा घेण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेकरीता एकूण ४० केंद्रांची निवड करण्यात आली आहे. परीक्षा पेपर १ सकाळ सत्र व पेपर २ दुपार सत्र अशा दोन सत्रात घेण्यात येणार आहे. परीक्षेकरिता ठाणे व कळवा शहरातील सकाळ सत्रासाठी २३ परीक्षा केंद्र व दुपार सत्रासाठी १७ परीक्षा केंद्रांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रासाठी केंद्र संचालकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ७ झोन आखण्यात आले असून पेपर १ साठी ४ झोन व पेपर २ साठी ३ झोन आखण्यात आले आहेत.  
  परीक्षा गृहात मोबाईल आणण्यास मनाई आहे. तसेच उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येईल असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तथा सदस्य सचिव जिल्हा परीक्षा आयोजन व संनियंत्रण समिती यांनी कळविले आहे.  







Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न