सामाजिक जीवनात प्रामाणिकपणा महत्त्वाचा - राज्यपाल




ठाणे दि.19 जिमाका :चांगले कर्म, निस्वार्थ सेवा आणि प्रामाणिकपणा ही यशस्वी होण्याची त्रिसुत्री आहे. सामाजिक जीवनात काम करतांना प्रामाणिकपणे काम करावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.ठाणे येथिल आर. जे. ठाकुर महाविद्यालयात चंद परिवार फाउंडेशन आयोजित पाचव्या  वार्षिक समारंभामध्ये ते बोलत होते.
यावेळी चंद परिवार फाउंडेशनचे  नॅशनल कमिटी अध्यक्ष दिबी चंद ,उपाध्यक्ष प्रकाश राजन,महासचिव महेश रजवाल,केंद्रीय कोषागार अध्यक्ष नवीन चंद ठाकुर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  म्हणाले चंद परिवार फाउंडेशन पाच वर्षे खुप चांगल्या प्रकारे समाजोपयोगी कार्ये करीत  आहेत. त्यांनी त्यांचे हे कार्य असेच पुढे  चालू ठेवावे. चांगल्या कामाची समाज नेहमी दखल घेत असतो. हिंदी ही राष्ट्रीय भाषा असली तरी महाराष्ट्रात आपण राहतो तर मराठी बोलायला शिकले पाहिजे.
 परिवार फाउंडेशन तर्फे उत्कृष्ट   काम केल्या बदल सुरेश राणाजी,बिरेंद्र नेगी,डॉ.दिनेश चंद यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या  हस्ते गौरवण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन इसिता कासवाणी यांनी केले.
0000000

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न