पायाभुत सुविधांबरोबरच पर्यटन विकासाला प्राधान्य--- पालकमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे दि. २६ जिमाका:
जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण,
रस्ते, उद्योग आणि सिंचन सुविधांचा विकास करण्याबरोबर ठाणे जिल्हा पर्यटन हब म्हणून विकसित करण्यास जिल्हा प्रशासनाचे प्राधान्य असेल, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी
आज येथे सांगितले.
भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या
७० व्या वर्धापनदिनानिमित्त पोलीस मैदानावर पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
झाले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणातून नागरिकांना शुभेच्छा देताना
ठाणे जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली.
पालकमंत्री श्री शिंदे
म्हणाले समाजाच्या सर्व घटकांचा विकास होण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना आखल्या आहेत. त्यांची जिल्ह्यात
प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. मात्र विकासाचा वेग अधिक गतिमान करण्यासाठी सर्व अधिकारी
- कर्मचारी आणि विभागांनी प्रभावी कामगिरी करायला हवी.जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून
गेली दोन वर्षे भरीव निधीची तरतूद केली आहे. ५३७ कोटींचा आराखडा निश्चित करण्यात आला
आहे. या विकास निधीतून विकासाला चालना मिळेल, असा आशावाद पालकमंत्री श्री.शिंदे
यांनी व्यक्त केला.
विजेचा प्रश्न सौर
उर्जेच्या माध्यमातून कसा सोडविता येईल याचे नियोजन सुरु आहे, जिल्ह्याचे या दृष्टीकोनातून मॕपिंग लवकरच करण्यात
येणार असल्याचे सांगून श्री शिंदे म्हणालेजीवो जीवस्य जीवनम्’ तत्त्वाचा स्वीकार करून शाश्वत शेती करणे गरजेचे आहे. शाश्वत शेती होण्यासाठी
तसेच शेतकरी सक्षम होण्यासाठी विविध उपाययोजना आगामी काळात राबविण्यात येणार आहेत.जनतेच्या
हिताचे व जिव्हाळ्याचे निर्णय तात्काळ घेण्यास
प्राधान्य दिले आहे. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विकासाचे नियोजन करण्यात आले
आहे.
सार्वभौमत्व संविधानाचे
जनहित सर्वांचे या उपक्रमामुळे शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या मनावर संविधानिक मूल्यांची
रुजवणूक होणार आहे. यामुळे सुजाण, जबाबदार व सुसंस्कृत नागरिक घडविण्यास मदत होईल
असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ध्वजारोहणानंतर शानदार
संचलन झाले. यावेळी पालकमंत्र्यांना सलामी देण्यात आली. संचलनात शहर पोलीस, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १०,
वाहतूक शाखेसह राष्ट्रीय छात्र सेना, सैनिक स्कूल
व स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
या कार्यक्रमास जिल्हा
परिषद अध्यक्ष दिपाली पाटील खासदार राजन विचारे आमदार संजय केळकर रवींद्र फाटक , महापौर नरेश म्हस्के,जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर शहर पोलीस
आयुक्त विवेक फणसाळकर पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी
हिरालाल सोनवणे यांसह स्वातंत्र्यसैनिक जेष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मेजर
प्रांजल जाधव ,हरिष वायदंडे,माधुरी तरमाळे भारत तावरे,कृष्णा भोसले,नरेद्र मोटे,संजय
पवार,मनोज परदेशी,संदिप मोरे,विलास धमाले यांना
पालमंत्री महोदय यांच्या हस्ते उत्कृष्ट काम केल्याबदल गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
करण्यात आले,यावेळी अप्पर जिल्हाधिकारी
वैदेही रानडे,निवासी उप जिल्हाधिकारी शिवाजी पाटील,उप विभागीय अधिकरी अविनाश शिंदे,उपस्थित होते.यांसह
अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment