केंद्र
पुरस्कृत योजनाची अंमलबजावणी काटेकोरपणे करा- खासदार राजन विचारे
--------------
दिशा समितीत
घेतला केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा
ठाणे
दि.29 जिमाका: केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनाची अंमलबजावणी
काटेकोरपणे करुन पात्र लाभार्थांना जास्तीत जास्त लाभ मिळावा
यासाठी प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च करावा असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा)
अध्यक्ष तथा खासदार राजन विचारे यांनी सर्व विभागांना दिले. आज जिल्हा नियोजन
समिती सभागृहात सन 2019-20 ची दिशा सभा संपन्न
झाली. त्यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. पुढे श्री.
विचारे म्हणाले की, दिशा समितीची बैठक नियमित दर तीन महिन्यांनी होईल. त्यावेळी संबधित
विभागाच्या विभाग प्रमुखांनी विषयाच्या सखोल माहितीसह उपस्थित राहायला हवे. असे
त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील ,सर्वश्री आमदार दौलत दरोडा,कुमार आयलानी, गिता जैन,जिल्हाधिकारी
राजेश नार्वेकर,मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे,भिवंडी म.न.पा. आयुक्त डॉ.प्रविण आष्टिकर ,उल्हासनगर
म.न.पा. आयुक्त सुधाकर देशमुख, ठाणे म.न.पा.अतिरिक्त आयुक्त
समिर उन्हाळे, प्रकल्प संचालक डॉ.रुपाली सातपुते,आदि मान्यवर तसेच विविध विभागाचे
अधिकारी व कर्मचार उपस्थित होते.
यावेळी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना,प्रधान मंत्री सडक योजना,प्रधानमंत्री आवास योजना,स्वच्छ भारत मिशन,राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना,
सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री आवास योजना,प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना,एकात्मिक बाल
विकास योजना,दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना,आदि 28 केंद्र पुरस्कृत योजना
आढावा घेण्यात आला.
याप्रसंगी
बोलताना श्री नार्वेकर म्हणाले की,
आजची सभा ही पुढील काळात योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी दिशा दर्शक ठरेल. दर तीन महिन्यांनी योजनाच्या
प्रगतीचा आढावा घेतला जाणार असून स्वत:
सक्षम अधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित राहायला हवे. तसेच आजच्या बैठकीला जे अधिकारी गैरहजर राहिले आहेत त्यांना
लेखी सुचना देण्याचे निर्देश त्यांनी दिले. सभेचे प्रास्तविक आणि आभार प्रकल्प
संचालक डॉ. रुपाली सातपुते यांनी करून सभा
खेळीमेळीचे वातावरण संपन्न झाल्याचे सांगितले.
Comments
Post a Comment