नाशिक व इगतपुरीमध्ये एकात्मिक फालोत्पादन अभियान
ठाणे दि ३१ जिमाका : एकात्मिक फलोत्पादन अभियान सन २०१९-२०२० मनुष्यबळ
विकास कार्यक्रमांतर्गत प्रशेत्र (on farm training ) कार्यक्रम
ठाणे जिल्ह्यात मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे यांनी आयोजित केला आहे. सदरचा
अभ्यासदौरा दिनांक १० फेब्रुवारी २०१९ ते २४ फेब्रुवारी २०२० असा एकूण ०५ दिवस
नाशिक जिल्ह्यातील नाशिक उपविभागातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर आयोजित
करण्यात आला आहे. नाशिक मधील चिंचवड व सतपुर गावातील तपशील हा आंबा घन लागवड व
रोपवाटिका, आनंद अॅग्रो,भगर मिल, बेन्सन अॅग्रो, नवयुग ब्लोअर असा आहे. त्याचबरोबर पिंपळगाव खांब, बेळगाव ढगा या गावांचा
तपशील वनदेवी रोपवाटिका, भाजीपाला रोपवाटिका असा आहे, तसेच मोहाडी गावातील तपशील
सह्याद्री फार्म एफ पी ओ आहे, गंगापूर व गोवर्धन गावात कृषि विज्ञान केंद्र नाशिक,
सिला वाईन्स व वायनरी असा तपशील आहे. तसेच इगतपुरी तालुक्यातील इगतपुरी गावाचा
तपशील हा भात संशोधन केंद्र, सेंद्रीय शेती,लाकडी घाना तेल केंद्र,गुळ असा आहे.
अभ्यासदौऱ्यासाठी तालुका निहाय कल्याण-१२,
उल्हासनगर-१२, भिवंडी-२०, मुरबाड-२६, शहापूर-३० असा एकुण ठाणे जिल्ह्याकरिता-१००
शेतकऱ्यांचा लक्षांक निश्चित करण्यात आलेला असून मर्यादेपेक्षा अधिक अर्ज प्राप्त
झाल्यास विहित पद्धतीने अर्जाची सोडत जेष्ठता सुचीनुसार प्रशिक्षणासाठी
शेतकर्यांची निवड करण्यात येईल. त्याचबरोबर महिला/अनु.जाती/अनु.जमाती प्रवर्गातील
शेतकऱ्याना प्राधान्य दिले जेईल. सदर प्रशिक्षणार्थींचे प्रवास,भोजन व निवास
व्यवस्था विनामुल्य करण्यात येईल. तसेच ठाणे जिल्यातील इच्छुक शेतकऱ्यानी आपली
नावे/अर्ज आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी, कार्यालयात दिनाक ७ फेब्रुवारी
२०२० पर्यंत सादर करावेत असे आवाहन उप विभागीय कृषि अधिकारी कल्याण जिल्हा-ठाणे
यांनी केले आहे.
0000000
Comments
Post a Comment