महाराष्ट्रातील धनगर समाजासाठी घरकुल योजना
ठाणे दि.३१ जिमाका :
महाराष्ट्रातील भटक्या व विमुक्त जमातीमधील धनगर समाजातील लोकांचा सर्वांगीण
विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन लोकांसाठी दहा हजार वैयक्तिक लाभार्थी घरकुल
बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सदर योजनेकरिता जातीचा दाखला, आधार कार्ड, १
लाख रुपयाच्या आतील उत्पन्नाचा दाखला, नमुना नं ८ स्वत:च्या मालकीची जागा,
यापूर्वी महाराष्ट्रात कुठेही घरकुलाच लाभ घेतला नसल्याचे १०० रुपयाच्या
स्टॅम्पवरवर प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड, विहित नमुन्यातील अर्जासोबत जोडून हे अर्ज
दाखल करण्याची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२० आहे. अधिक माहितीकरिता तालुक्यातील
गटविकास अधिकारी पंचायत समिती व जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे
यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे
आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,ठाणे बलभीम शिंदे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment