1 मार्च पासून दिव्यांग उपकरण शिबीराचे आयोजन
ठाणे दि.१७ जिमाका: जिल्हा विधी
सेवा प्राधिकरण, आयोजित तथा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी
सेवा प्राधिकरण, मुंबई व भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती, एम.एल.ए. हॉस्टेल,
नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०१ ते ०७ मार्च २०२० रोजी एम.एल.ए. हॉस्टेल,
नागपूर येथे दिव्यांग उपकरण चिन्हीकरणाच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबीरामध्ये दिव्यांगांसाठी तीनचाकी
सायकल, व्हीलचेअर, कैलीपर्स, कृत्रिम जयपूर पाय-हात, कुबड्या, शुज, बेल्ट, कानाचे
मशीन या सर्व उपकरणाचा समावेश असणार आहे व लाभार्थ्यांना विनामुल्य या उपकरणांचा
लाभ घेता येणार आहे.
सदर शिबीराचा लाभ घेण्याकरिता इच्छूक
लाभार्थींनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे येथे दि. २२ फेब्रुवारी पर्यंत नाव
नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे, एम.आर.देशापांडे यांनी
केले आहे.
00000
Comments
Post a Comment