नवीन मतदार नोंदणी व दुरुस्तीसाठी मुद्दत वाढ



        ठाणे दि.18 जिमाका : भारत निवडणूक आयोगाने दि. 01 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला असून सदर कार्यक्रमास मुदतवाढ दिलेली आहे. सदर कार्यक्रमांतर्गत  दिनांक 13 मार्च, 2020 ते  दिनांक 15 एप्रिल ,2020 पर्यंत ठाणे जिल्हयातील 18 विधानसभा मतदार संघामध्ये दावे हरकती स्विकारण्यात येणार असून दिनांक 30 एप्रिल, 2020  रोजी दावे हरकती निकाली काढण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमांतर्गत दिनांक 15 मे, 2020 रोजी अंतिम मतदार यादीची प्रसिध्दी करण्यात येणार आहे.
              तसेच शनिवार दि. 28 मार्च, 2020,रविवार दि. 29 मार्च 2020 शनिवार दि. 11 एप्रिल2020 ,रविवार दि.12 एप्रिल, 2020 या दिवशी ठाणे जिल्हयातील 18 विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी मोहिम आयोजित करण्यात येणार आहे.
               सदर विशेष मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्हयातील 18 विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर / मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. सदर मोहिमेमध्ये मान्यताप्राप्त राजकीय पक्षाकडून नेमण्यात आलेले मतदान केंद्रस्तरीय सहाय्यक (BLA)  उपस्थित राहणारआहे.
                 ठाणे जिल्ह्यातील सर्व मतदारांनी विशेषत: 18 ते 21 वयोगटातील तरूणांनी, नवविवाहीत महिलांनी तसेच दि. 01 जानेवारी 2020  रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करावी दि. 01 जानेवारी 2020 रोजी 18 वर्ष पूर्ण होवू घातलेल्या भावी मतदारांनी दि. 15 एप्रिल, 2020 पर्यंत आपले नावाची नोंदणी मतदार यादीमध्ये करावी असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे अर्पना सोमाणी यांनी केले आहे.
000000



Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न