ठाणे दि ११. जिमाका :ठाणे जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने निवृत्तीवेतन धारकांकरीतात्रैमासिक मेळावा दि.१५ फेब्रुवारी रोजी स.११ वा जिल्हा कोषागार
कार्याल ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची इच्छा -साईशा पवार ठाणे,दि.07(जिमाका):- ठाण्याची उदयोन्मुख क्रीडापटू साईशा विशाल पवार (वय 15) हिने राष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करत ठाणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. नुकत्याच ओडिशातील भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियममध्ये पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सायेशाने अडथळा शर्यतीत (Hurdles) रजत पदक पटकाविले आहे. साईशा ट्रायथलॉन, पेंटाथलॉन आणि हर्डल्स या क्रीडा प्रकारांत प्रावीण्य मिळवत आहे. तिने आतापर्यंत चार वेळा राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतला आहे. या राष्ट्रीय पदकापूर्वी, साईशाने जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पेंटाथलॉन आणि हर्डल्स शर्यतीत सुवर्णपदके जिंकून आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना साईशा म्हणाली की, या यशामागे माझे प्रशिक्षक दर्शन देवरुखकर आणि सदाशिव पांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रशिक्षकांच्या अचूक मार्गदर्शनामुळेच मला हे यश मिळविता आले. या प्रवासात माझ्या कुटुंबाचाही मोठा पाठिंबा आहे. माझे आई-वडील आणि आजी-आजोबा यां...
कोकण व मुंबई प्राधिकरण विभागातील 33 उद्योजकांनी पटकाविले सर्वाधिक 45 पुरस्कार ठाणे,दि.14(जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत राज्यातील उत्कृष्ठ कामगीरी करणाऱ्या निर्यातदार उद्योजकांना महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार- 2025 वितरण सोहळा राज्याचे मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते काल, दि.13 ऑक्टोबर 2025 रोजी हॉटेल ताज लँड्स, बांद्रा (पश्चिम), मुंबई येथे संपन्न झाला. राज्यातील एकूण 67 पुरस्कारांपैकी तब्बल 45 निर्यात पुरस्कार एकट्या कोकण आणि मुंबई प्राधिकरण विभागाच्या 33 कर्तृत्ववान उद्योजकांनी पटकावले, हे यश खऱ्या अर्थाने अभूतपूर्व आणि प्रेरणादायी आहे. या राज्यस्तरीय एकूण 67 निर्यात पुरस्कारामध्ये कोकण विभाग व मुंबई प्राधिकरण विभागातील एकूण 33 उद्योजकांना 45 निर्यात पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये कोकण विभागातून एकूण 21 उद्योजकांना यावर्षी सुवर्ण व रजत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यापैकी ठाणे-14, पालघर-03, रायगड-02 व रत्नागिरी-02 या जिल्ह्यातून निर्यातदार उद्योजकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच मुंबई ...
ठाण्याचे नवीन जिल्हा शासकीय रुग्णालय येणाऱ्या पिढ्यांसाठी आशेचा किरण ठरेल -आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर ठाणे,दि.12(जिमाका):- रुग्णालय ही फक्त इमारत एक नसते, ती मानवतेची सेवा आणि करुणेचा पाया असते. ठाण्याचे हे नवीन जिल्हा शासकीय रुग्णालय येणाऱ्या पिढ्यांसाठी आशेचा किरण ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज येथे केले. राज्याचे सार्वजनिक आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामस्थळास भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्य रुग्णालय इमारतीमधील बाहयरुग्ण विभाग, अपघात विभाग, एमआरआय विभाग, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, क्ष-किरण, मॅमोग्राफी, आंतररुग्ण विभाग, प्रसूती विभाग, मॉडयुलर शस्त्रक्रियागृह तसेच हेलीपॅड तसेच वाहनतळ इमारत व परिचारीका प्रशिक्षण केंद्र व वसतीगृह आणि वसतीगृह इमारतीची पाहणी केली. या बांधकामाचे क्षेत्रफळ हे 92 हजार 539.00 चौ.मी. असून आरोग्य मंत्री श्री.आबिटकर यांनी पाहणी दरम्यान नवीन रुग्णालयाचे बांधकाम 87 ...
Comments
Post a Comment