शेअर प्रवासी वाहतूकीवर बंदी
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj5KnSGFASepA8fsl-804Mlpb_KP6nBi7oed51ipdzZXTMJcWBJbvOafPjR3bL-JdMsmuo1jb624sLbBHOryUkoO50-J8iiBi5v-KQbJUsDXicK08f7crufET02u94wrhs-ea18nTxFoN6E/s320/1.jpg)
ठाणे दि. 20 - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबधात्मक उपयायोजना म्हणून ठाणे जिल्ह्यात टाळण्यासाठी शेअर रिक्षा , शेअर ओला , शेअर उबर व ग्रामीण भागातील काळया पिवळया जीप अशा प्रकारची एकत्रित प्रवासी वाहतूक करणारी व्यवसायिक वाहनांवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. शेअर रिक्षा , शेअर ओला , शेअर उबर व ग्रामीण भागातील काळया पिवळया जीप मधुन सर्व सामान्य प्रवासी शेअरींगव्दारे शहरांतर्गत व ग्रामीण भागात ये-जा करत असतात , त्या अनुषंगाने प्रवासा दरम्यान कोरोना विषाणू ( COVID-19) या प्रसार व प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अशी शेअरींग प्रवासी वाहतुक करणारी वाहने जसे “ शेअर रिक्षा , शेअर ओला , शेअर उबर व ग्रामीण भागातील काळ्या-पिवळ्या जीप ही प्रवासी वाहतूक करणारी व्यवसायिक वाहने इत्यादी दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत पुढील आदेश होई पर्यंत बंद ठेवण्यात यावीत , असे आदेश दिले आहेत. सदर आदेशा...