31 मार्च पुर्वी वाहनाची नोंदणी करण्याचे आवाहन
ठाणे दि.13 (जिमाका): देशभरात भारत स्टेज-6 मानांकन नसलेली वाहने विक्री व
नोंदणी करण्यास मनाई केली आहे. भारत स्टेज-4 मानांकनाची वाहने खरेदी केली असल्यास
त्यांची नोंदणी दि .31 मार्च 2020 पुर्वी
होऊन त्यांना नोंदणी क्रमांक जारी होणे आवश्यक आहे. भारत स्टेज -4 मानांकनाची
वाहने दि. 31 मार्च 2020 पुर्वी नोंदणी न झाल्यास रस्त्यावर वापरता येणार नाहीत. दि
31मार्च 2020 रोजी वा त्यापूर्वी होणारी गर्दी पाहता तसेच ऐनवेळी कागदपत्रात काही
त्रुटी उद्भवण्याची शक्यता पाहता वाहन मालकांनी त्यांची वाहने ताबडतोब नोंदणीसाठी
सादर करावीत.
यापूर्वी खरेदी केलेल्या काही
वाहनांच्या बाबातीत कागदपत्रातील त्रुटीमुळे अथवा कोणत्याही कारणाने नोंदणीची
प्रक्रिया अपूर्ण राहिली असल्याची शक्यता
आहे. केवळ शुल्क व कर भरल्यामुळे नोंदणी प्रक्रीया पुर्ण
होत नाही तर वाहनास नोंदणी क्रमांक जारी झाल्यावरच सदर प्रक्रीया कायदेशिररित्या
पूर्ण होते.
सर्व वाहन धारकांनी त्यांच्या
मालकीची वाहने नोंदणी झाली असल्याबाबत खात्री करावी .ज्या वाहन मालकांनी वाहनाचे
मुळ आरसी पुस्तक प्राप्त झाले नाही त्यांनी त्याचा वाहन क्रमांक www.parivahan.gov.in या वेबसाईट वर तपासून
घ्यावा. सदर वेबसाईटवर वाहनाची माहिती उपलब्ध नसल्यास त्वरीत वाहन विक्रत्याकडे
अथवा नजीकच्या आरटीओ कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन
अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी केले आहे.
Comments
Post a Comment