क्वारंटाईन सेंटर्सची क्षमता वाढवा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोव्हीड-19 चे नियोजन करा आढावा बैठकीत पालकमंत्री ना. शिंदे यांच्या सूचना
ठाणे
दि. 18 :- कोरोना कोव्हीड19 ची वाढती
संख्या लक्षात घेवून ठाणे शहरामध्ये आपल्याला क्वारंटाईन सेंटर्सची क्षमतावाढविण्याची
गरज व्यक्त करून पावसाळा तोंडावर आला असल्याने त्यादृष्टीकोनातून कोव्हीड19
चे नियोजन करा अशा सूचना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे
पालक मंत्रीना. एकनाथ शिंदे यांनी आज महापालिका आयुक्त विजय सिंघल
यांना दिल्या.
कोरोना
कोव्हीड 19 ची आढावा बैठक ना. शिंदे यांनी आज महापालिका मुख्यालयामध्येआयोजित केली होती. त्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मुंब्रा,
किसननगर,सीपी तलाव, लोकमान्यनगर,
राबोडी आदी दाट लोकवस्ती आणि झोपडपट्टी असलेल्या परिसरात जास्तपाळत ठेवून
याचा प्रादूर्भाव वाढणार नाही यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचनादिल्या.
दरम्यान शहरामध्ये आयसीयू आणि ॲाक्सीजन युनिट असलेल्या बेडसची आवश्यकताअसून
ती संख्या वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन करावे तसेच कोरोना बाधित गरोदर महिलांवरउपचार
करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची गरज आहे असे सांगून ना. शिंदे यांनी पावसाळ्यामध्येइतर रोगाचे रूग्णही वाढू शकतात हे लक्षात घेवून
तशा पद्धतीची यंत्रणा निर्माण करण्याच्यासूचना त्यांनी महापालिका प्रशासनास दिल्या.
त्याचबरोबर डायलेसीस
रूग्णांची संख्या लक्षात घेवून त्यांच्यासाठीहीउपचाराच्या सुविधा वाढविण्याच्या
सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांना केल्या. या बैठकीसमहापालिका आयुक्त विजय सिंघल
आणि महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment