थायरोकेअर लॅबला ठाण्यात कोव्हीड 19 चे स्वॅब तपासणी करण्यास बंदी असमाधानकारक कोविड चाचणी सुविधेबद्दल महापालिकेचा निर्णय



ठाणे दि. 22 :-  थायोरोकेअर लॅब या आयसीएमआरच्या अधिकृत प्रयोगशाळेत कोव्हीड 19 च्या स्वब तपासणीत 6 प्रकरणात चुकीचा अहवाल आढळल्याने या लॅबला ठाण्यात कोव्हीड 19 चे स्वॅब तपासणी करण्यास बंदी घालण्याचा आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिला आहे.
ठाणे शहरात कोरोना कोव्हीड - १९ची प्राथमिक लक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांची कोव्हीड - १९ची तपासणी शासनमान्य प्रयोगशाळेकडेच करण्यात येते. थायोरोकेअर लॅब आयसीएमआरच्या अधिकृत प्रयोगशाळेच्या यादीमध्ये घोषित करण्यात आली होती. परंतु ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सदरप्रयोगशाळेने दिलेल्या 6 प्रकरणांमध्ये चुकीचा अहवाल असल्याचे आढळून आले. यामुळे अनेक रूग्णांना सामाजिक आणि मानसिक त्रासातून जावे लागले होते.
त्यामुळे २२ मे २०२० पासून ठाणे महानगरपालिकाक्षेत्रातील संशयितांसाठी कोविड -19 स्वॅब गोळा करू नये असे आदेश ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. कोविड चाचणी बाबत असमाधानकारक सुविधा दिल्यामुळे महापालिकेच्यावतीने हा निर्णय घेण्यातआला आहे.
--


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे 21 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक समावेशन सॅच्युरेशन शिबिराचे आयोजन