नवी मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे निर्जंतुकीकरण काम अंतिम टप्प्यात



 ठाणे  दि. 14:- मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती मार्फत साफसफाई, निर्जंतुकीकरण, वैद्यकीय तपासणी विशेष मोहिम राबविण्यासाठी ११ मे ते १७ मे २०२० पर्यंत सर्व बाजार आवारे बंद ठेवण्यात आली आहेत.  त्यात हजार ४७५ नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.  अशी माहिती आज बैठकीत देण्यात आली.  या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोकण विभागाचे महसूल आयुक्त श्री. शिवाजी दौंड हे होते. 
                फळ मार्केट, भाजी मार्केट, मसाला, कांदा-बटाटा, धान्य आदिंची निर्जंतुकीकरण करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका आणि तेरणा हॉस्पिटलच्या २५ वैद्यकीय पथक संख्येने ही तपासणी केली. 
                येत्या सोमवार पासून कोविड-१९ च्या सर्व निर्देशांचे पालन करुन मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती सुरु ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. 
                या बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी/प्रतिनिधी उपस्थित होते.
*****

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न