दिल्लीहून विशेष रेल्वेने विद्यार्थ्यांचे आगमन



ठाणे दि. 18 :- महाराष्ट्रातील यूपीएससीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी  दिल्ली रेल्वे स्टेशनवरून सोडण्यात आलेली विशेष ट्रेन कल्याण  रेल्वे स्टेशन येथे काल रात्री  १०.४०  वाजता पोहोचली.

   कोकण विभागातील सर्व  जिल्ह्यातील ८८विद्यार्थी होते.यामध्ये   मुंबई १८ , ठाणे ४२ , मुंबई उपनगर ९ , पालघर ५ , रायगड ९ रत्नागिरी ५  असे एकुण ८८ विद्यार्थी होते.  या सर्वांना  प्रथम सोशल डिस्टंसींग बाबत सुचना देण्यात आल्या.

सर्व विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी वैद्यकीय पथकामार्फत  करण्यात आली. कोविड १९ संदर्भात संशयित आढळले नाहीत.
त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या तळहाताच्या मागील बाजूस होम क्वारंटाईनचा  शिक्का मारून त्यांना त्यांच्या जिल्ह्यांमध्ये एसटी बस मार्फत पाठविण्यात आले. ठाणे  शहर आसपासच्या विद्यार्थ्यांना  त्याच्या इच्छीत ठिकाणी जाण्यासाठी आवश्यकते नुसार खाजगी वाहन उपलब्ध करुन देण्यात आले.
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर  यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार दिपक आकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी शासनाचे आभार मानले.
00000

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न