31 ऑगस्ट पर्यंत निवृत्ती वेतनधारकांनी माहिती सादर करण्याचे आवाहन
31 ऑगस्ट पर्यंत निवृत्ती वेतनधारकांनी माहिती
सादर करण्याचे आवाहन
ठाणे दि.12( जिमाका):जिल्हा कोषागार कार्यालय
ठाणे येथून निवृत्तीवेतन/ कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांची माहिती निवृत्तीवेतन वाहिनी प्रणालीमध्ये
अदयावत करावयाची असल्याने खालील मुद्देनिहाय माहिती दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत
सादर करावी. १) निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांचे पूर्ण नाव व
पूर्ण पत्ता २) पीपीओ क्रमांक, ३) बँकेचा तपशिल (बँकेचे नाव, शाखेचे नाव व खातेक्रमांक) ४)
पॅन कार्ड(झेरॉक्स जोडावी), ५) भ्रमणदूरध्वनी, ६)ईमेल आयडी(असल्यास) इत्यादी
माहिती खालील पत्यावर व ईमेलव्दारे
पाठविण्यात यावी.ईमेल आयडी to.thane@zillamahakosh.inपत्रव्यवहारचा पत्ता :-
जिल्हा कोषागार कार्यालय, निवृत्तीवेतन शाखा, तळमजला, जिल्हाधिकारी
कार्यालय परिसर, कोर्ट नाका, ठाणे – 400601 असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी राजेश भोईर यांनी
केले आहे.
Comments
Post a Comment