स्वातंत्र्य सैनिक दामोदर उसगावकर यांचा सन्मान

 

स्वातंत्र्य सैनिक  दामोदर उसगावकर यांचा सन्मान

 

ठाणे  दि. ९( जिमाका): राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथील सत्कार समारंभासाठी निवड करण्यात आलेले  स्वातंत्र्य सैनिक श्री. दामोदर सोहिरोबा  उसगावकर यांचा सन्मान  महाराष्ट्र शासनाचे वतीने जिल्हाधिकारी ठाणे यांचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय दंडाधिकारी ,ठाणे अविनाश शिंदे यांनी    त्यांचे प्रतिनिधी म्हणून  मुलीचा शाल व श्रीफळ देऊन गौरव केला. 

 

दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त महामहीम राष्ट्रपती यांचेकडून सन्माननीय स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार समारंभ राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे आयोजित केला जातो. यासाठी महाराष्ट्रातून १० स्वातंत्र्य सैनिकांची निवड केली होती.  परंतु  कोविड-१९ प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेवून ९ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य सैनिकांना राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे बोलवित  येणार  नाही, असे केंद्र शासनाने कळविले होते. 

 

उपरोक्त परिस्थितीच्या अनुषंगाने,  सत्कार समारंभासाठी निवड करण्यात आलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान,  स्वातंत्र्य सैनिकांचे घरी जाऊन त्यांना शाल वस्त्र देऊन करावा, असे केंद्रीय गृह मंत्रालयाचे निर्देश होते. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील श्री उसगावकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या वतीने त्यांच्यामुलीने हा सत्कार स्विकारला.

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ