पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण

 

पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण

 

ठाणे दि. 14 (जिमाका):-  भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ शनिवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री  एकनाथ शिंदे  यांच्या हस्ते होणार आहे.

 

या दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 या दरम्यान इतर कोणत्याही शासकीय अगर निमशासकीय कार्यालयांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करु नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.35 वाजेच्या पूर्वी किंवा 9.35 वाजेच्या नंतर आयोजित करावा. दि. 15 ऑगस्ट  रोजी सर्व सार्वजनिक व शासकीय इमातींवर, तसेच ऐतिहासिक महत्वाच्या किल्ल्यांवर राष्ट्रध्वज उभारण्यात यावा.

 

स्वातंत्र्य दिनाचा 73 व्या वर्धापन दिनानिमित्त प्लास्टिकचे झेंडे न वापरण्याबाबत तसेच कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये सामाजिक अंतर ठेऊन व याबाबतच्या सर्व नियमांचे पालन करण्याबाबत तसेच प्रत्येकाने चेहऱ्यावर मास्क परिधान करणे अनिवार्य आहे.

000000000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”