आदिवासी बांधवाच्या समस्या तात्काळ सोडवा -मंत्री के.सी.पाडवी.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgSnjhrNsbVEoB5rSd4Ci1DdpODQ8FZH_bs-U4jfiRwAG2r3CeSGkrpehGrq5-m9j6I33Tzn2F_uKaShvUTvCX3kFSwmZAtaRijUciqWM1nJcDes96rqtt6vSNLs4GXiifHIDAT9h8ptJhk/s640/%25E0%25A4%2586%25E0%25A4%25A2%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%25AC%25E0%25A5%2588%25E0%25A4%25A0%25E0%25A4%2595+-%25E0%25A4%2586%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B8%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%2595%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B8+%25E0%25A4%25AE%25E0%25A4%2582%25E0%25A4%25A4%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A5%2580-1.jpg)
यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,पोलीस आयुक्त
ठाणे ग्रामीण, डॉ.शिवाजी राठोड,संबधित
विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
आदिवासी विकास मंत्री पाडवी यांनी तालुका निहाय आदिवासी योजनाचा आढावा
घेतला व समस्या जाणून घेतल्या.आदिवासी
भागात जातीचा दाखला मिळत नसल्यामुळे विद्यार्थांना योजनाचा लाभ मिळत नाही त्यामुळे
आदिवासी भागात जातीच्या दाखल्यासाठी कॅप आयोजीत करा असे निर्देश संबधिताना दिले.
आदिवासी शेतकऱ्यांना त्यांचा शेतीविकास किफायतशीरपणे होण्याच्या दृष्टिने उपलब्ध
असलेल्या साधनांचा व उर्जेचा पुरेपूर
उपयोग करुन आदिवासी भागात जे उत्पादन होते त्याच्या उत्पादनाचे मार्केटींग करणे
गरजेचे आहे .वंदन केंद्र शहापूर ,यांनी आदिवासी भागात केलेल्या कामाचे कौतूक केले.
00000
Comments
Post a Comment