नागरी संरक्षण पदविका आभ्याक्रमासाठी इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन

 


ठाणे दि.19( जिमाका):नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालय, मुंबई महाराष्ट्र शासन येथे नविन सुरु होणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमासाठी, आपत्ती व्यवस्थापन पदवित्तर पदविका अभ्यासक्रम मुंबई विद्यापिठाच्या संलग्नतेने सप्टेंबर-2020 ते जून-2021 या कालावधीत सुरु करण्यात येत आहे.

नागरी संरक्षण संघटना ही आप्ती प्रसंगी दुर्घटनास्थळी प्रथम प्रतिसाद देऊन नागरीकांना आवश्यक ती मदत व बचाव करण्याचे कार्य करते तसेच शांतता काळात सामान्य नागरीक शासकीय-निमशासकीय, खाजगी आस्थापना आणि उद्योगांमधील आस्थापना वरील अधिकारी / कर्मचारी यांना तसेच शाळा-कॉलेज मधील शिक्षक व विदयार्थांना आपत्ती व्यवस्थापनामध्ये प्रशिक्षित करते.आपत्ती व्यवस्थापन पाठ्यक्रम ( Post Graduate in Disaster Management )  12 महिने  सप्टेंबर, 2020 ते जून 2021 असा काळावधी आहे .

 या प्रवेशासाठी प्रती बॅच 20 प्रशिक्षणार्थी  क्षमता आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर ( 60% पेक्षा अधिक गुण आवश्यक ) नियमानुसार मागासवर्गीय राखीव, रु. 59,000/- + रु. 500/- ( प्रक्रिया शुल्क) आहे. सदर पदविका पाठयक्रमाचे शुल्क Commandant, civil defence staff College, Mumbai यांचे नावे धनाकर्षाद्वारे ( DD ) जमा करण्यात यावे.पाठयक्रमासाठी प्रवेश अर्ज व शुल्क दि. 07 सप्टेंबर 2020 पर्यंत जमा करण्यात यावे.प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. सदर पदविका पाठयक्रमाचे प्रवेश अर्ज व माहिती पुस्तिका http://maharashtracdhg.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

सदर पदविका पाठयक्रमाचा प्रवेश अर्ज समादेशक, नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालय, तळ मजला, जुनेसचिवालय, जोड इमारत, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई - 400032. यांचे कार्यालयात विहित वेळेत जमा करावे.असे आवाहन  अधिक्षक,नागरी संरक्षण प्रशिक्षण  महाविद्यालय महाराष्ट्र शासन स्मिता शिंदे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न