आंतरजिल्हा वाहतूक करताना खाजगी प्रवासी बसेस यांनी अंमलात आणावयाची मानक कार्यपद्धती
ठाणे दि. 10 (जिमाका): परिवहन आयुक्त कार्यालयाकडून कोव्हीड १९ महामारी च्या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा प्रवासी वाहतूकीस परवानगी देण्यात आलेली आहे. सदर वाहतूक करताना खाजगी प्रवासी बस मालकांनी खालील मानक कार्यपद्धती अमलात आणावी. खाजगी प्रवासी बस ऑपरेटर यांनी कोव्हीड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेचपरिवहन विभागाने निर्गमित केलेल्या निर्देशांचे तंतोतत पालन करावे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम , १९८९ च्या नियम २० (१) ( x ) मधील तरतूदीनुसार लोकसेवा वाहनाच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार कंत्राटी बसच्या चालकाने त्यातून प्रवास करणारा पर्यटक गट बदलताना तसेच प्रवासाच्या प्रत्येक दिवशी प्रवासी बसचे निर्जतुकीकरण करावे. बसचे आरक्षण कक्ष/कार्यालय , चौकशी कक्ष यांची वेळोवेळी स्वच्छता करावी. तसेच , सदर ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना मास्क , सॅनिटायझरचा वापर करावा. बसेस जिथे उभ्या राहतात त्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. मास्क परिधान न कलेल्या प्रवाशांना बसमध्...