बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कारासाठी 15 सप्टेबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


ठाणे दि.10 (जिमाका):केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याणपुरस्कार दिला जातो. बाल शक्ती पुरस्कार सन २०२१ व बालकल्याण पुरस्कार २०२१ करिता केद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. सदरचे अर्ज हे www.nca-wcd.nic.in हया संकेतस्थळा मार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत सदर पुरस्काराची माहिती सदरच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक १५ सप्टेबर२०२० पर्यत आहे.

बाल शक्ती पुरस्कार : ज्या मुलांनी (वय ५ पेक्षा अधिक व १८ वर्षापर्यंतच्या) शिक्षण कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपुर्ण शेाध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुण कामगिरी केलेली आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो.

बालकल्याण पुरस्कार :

वैयक्तीक पुरस्कार : मुलांच्या विकास संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतुन किमान ७ वर्षे काम करण्या-या व्यक्तिस हा पुरस्कार दिला जातो.

संस्था स्तरावर : बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो संस्था पुर्णतः शासनाच्या निधीवर अवलंबुन नसावी. बालकल्याण क्षेत्रात किमान १० वर्षे सातत्यपुर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.असे आवाहन जिल्हा  महिला व बाल  विकास परिविक्षा अधिकारी ठाणे संदिप परदेशी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे 21 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक समावेशन सॅच्युरेशन शिबिराचे आयोजन