जिल्हा सैनिक कार्यालायाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक मदत
ठाणे दि.10 (जिमाका):मराठा
लाईट इंफंट्री बटालियनच्या मुंबई विभागात वास्तव्यास असलेल्या माजी सैनिकांच्या
तर्फे कोविड-१९ च्या संकट काळात मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रु. ५१,०००/- (रुपये एकवन्न हजार मात्र) रकमेचा धनादेश दि. ०३ सप्टेंबर २०२० रोजी जिल्हाधिकारी, ठाणे राजेश
नार्वेकर यांच्याकडे जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी, ठाणे मेजर प्रांजळ जाधव, १४ मराठा लाईट इन्फंट्री
बटालियनचे माजी सैनिक सुभेदार मनोहर शिर्के, सुभेदार विष्णू गायकवाड, सुभेदार विजय शिंदे व हवालदार दत्ताराम उतेकर यांच्या उपस्थीतीत सुपूर्द
करण्यात आला .
Comments
Post a Comment