केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली आर्थिक मदतीचे प्रस्ताव ऑनलाईन पाठविण्याबाबत.....
ठाणे दि. 10 (जिमाका): माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा
यांच्या (हवलदार पदापर्यंत) पाल्यांकरीता केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांचेकडून सन २०२०-२१ करीता RMDF/AFFDF मधून आर्थिक मदत मिळण्याची तरतूद आहे. सदर आर्थिक मदतीसाठी (www.ksb.gov.in) ऑनलाईन
अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे/पालघर यांनी केले आहे.
आर्थिक मदत निकष
- चारितार्थ अर्थिक मदत वय वर्ष 65 व पुढील पेंशन नसलेले माजी सैनिक विधवा रु
48000/- रुपये सन 2020-21 अंतिम मुदत 1
मार्च 2021 अशी आहे.शालेय शिक्षण आर्थिक मदत पहिल्या 2 पाल्यांस
रु.12000/-प्रतिवर्ष प्रतिपाल्य-1 ली ते 9 वी व 11 वी च्या पाल्यांनी 30 स्प्टेंबर
2020 पर्यंत अर्ज करावे.10 वी व 12 वी यांनी 30 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज करावे.बी.ए/बीएसी/बी कॉम यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावे.
मुलीच्या लग्नाची आर्थिक मदत
दोन मुलींसाठी प्रत्येकी रु.50000/- रुपये विवाहाच्या तारखेनंतर 180 दिवसांच्या आत अर्ज
करावे.अंत्यविधी आर्थिक मदत रु.5000/- मृत्यू दिनांकानंतर 01 वर्षाच्या आत अर्ज
करावे.अनाथ मुलासाठी आर्थिक मदत रु.12000/- प्रतिवर्ष मुदत नाही. 100 टक्के
मतिमंद/अपंग पाल्यासाठी आर्थिक मदत
रु.12000/- प्रतिवर्ष ,मुदत नाही.वैद्यकीय आर्थिक मदत रु 30000/- ते
125000/- हॉस्पीटल मधून डिस्चार्ज तारखेपासून 180 दिवसाच्या आत अर्ज करावा असे
आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment