नुकसानग्रस्त वास्तूंची दुरुस्ती,करण्यासाठी ,आवश्यक असलेल्या वस्तुंची दुकाने 31 मे पर्यंत स्थानिक प्राधिकरण यांनी निश्चित केलेल्या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी
नुकसानग्रस्त
वास्तूंची दुरुस्ती,करण्यासाठी ,आवश्यक असलेल्या वस्तुंची दुकाने 31 मे पर्यंत स्थानिक प्राधिकरण यांनी निश्चित केलेल्या
वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी
ठाणे दि.20 (जिमाका): मार्च २०२१ पासून कोविड १९ बाधितांची संख्या विचारात घेऊन राज्य शासनाने दि. १३ एप्रिल २०२१ रोजीच्या "Break The
Chain" आदेशान्वये दि. १४ एप्रिल २०२१ रोजी रात्री ८.०० वा. पासून दि.०१मे २०२१
रोजी सकाळी ७.०० वा. पर्यंत अनेक कठोर निर्बंध लागू केले होते. तसेच सदर आदेशांमध्ये
वेळोवेळी सुधारणा व मुदतवाढ घोषित केलेली आहे. दि.१२ मे २०२१ रोजीचे आदेशानुसार सद्यस्थितीत
दि.०१ जून २०२१ रोजी सकाळी ७.०० वा. पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. दि. १४ मे २०२१
रोजी ठाणे जिल्हयातील अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर नगरपरिषद / शहापूर, मुरबाड नगर पंचायत
व संपूर्ण ग्रामीण क्षेत्रामध्ये शासनाकडील आदेशात नमूद सर्व सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी
सर्व संबंधितांनी करणेबाबत आदेश निर्गमित करणेत आले आहेत.
तौक्ते चक्रीवादळामुळे उद्भवलेली आपत्तीजन्य परिस्थिती व झालेली अतिवृष्टी, यामूळे नुकसानग्रस्त झालेल्या
घर, वाडे, गोठे, इमारती इत्यादी वास्तूंची तात्काळ दुरुस्ती/ पुर्नबांधणी करणेसाठी
आवश्यक असलेल्या वस्तूंच्या विक्रीशी संबंधित आस्थापना अत्यावश्यक सेवा मानून सुरू
ठेवण्यास परवानगी दयावी व सदर आस्थापना सुरू ठेवण्याचा कालावधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन,
प्राधिकरण यांनी निश्चित करावा, असे निर्देश दिलेले आहेत.
ठाणे जिल्हयाचे क्षेत्रामध्ये केवळ नुकसानग्रस्त वास्तूंची
दुरुस्ती / पुर्नबांधणी इत्यादींसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचे वितरण व विक्रीशी संबंधित
असलेल्या आस्थापना दि.१९ मे २०२१ पासून दि. ३१ मे २०२१ पर्यंत स्थानिक प्राधिकरण यांनी
निश्चित केलेल्या वेळेत सुरू ठेवणेस परवानगी देत आहे.
आदेशाची सर्व संबंधितांनी तात्काळ अंमलबजावणी करावी. सदरहू
आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास
संबंधीतांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ ते ६०,
भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७ व भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १८८ नुसार
दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असे
ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरण राजेश नार्वेकर यांनी कळविले आहे.
00000000
Comments
Post a Comment