मनुष्य बळाची माहिती भरण्यासाठी कंपन्यांना 31 मे पर्यंत मुदत
मनुष्य बळाची माहिती
भरण्यासाठी कंपन्यांना 31 मे पर्यंत मुदत
ठाणे दि.21( जिमाका): ठाणे
जिल्हयातील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील
सर्व संस्था व कंपन्यांनी मनुष्यबळाची
माहिती (ER-I) राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या संकेत
स्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी 31 मे 2021 पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.
सेवायोजन कार्यालये कायदा 1959
अन्वये रिक्त सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय , निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील कायदयाअंतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर
असणाऱ्या सर्व
कर्मचाऱ्यांची पूरूष /
स्त्री अशी एकूण सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहिस कायदयाच्या तरतूदीनुसार भरणे
बंधनकारक आहे. मार्च 2021 अखेर संपणाऱ्या
तिमाहीची माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र, जुने कोषागार कार्यालय , जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे कार्यालयात
चालू आहे.
या संदर्भात
कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास thanerojgar@gmail.com ई-मेल आयडीवर उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर
सर्व आवश्यक तपशीलासह संपर्क साधल्यास कार्यालयाकडून सहकार्य करण्यात येणार आहे.
सर्व
आस्थापनांकडून 100 टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. सर्व आस्थापनांना यापूर्वीच
यूजर नेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत. त्यांचा वापर करून प्रत्येकाने या
विभागाच्या संकेत स्थळावर लॉगिन करावे व कायदयाचे अनुपालन करावे. असे जिल्हा
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे कार्यालयाच्या सहायक
आयुक्त कविता ह. जावळे कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment