"ताउत्के" चक्रीवादळाने ठाणे जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू तर पाच जखमी
ठाणे दि.18 :- "ताउत्के" चक्रीवादळाचा
प्रभाव ठाणे जिल्ह्यात सोमवार दि. १७ मे २०२१ रोजी सकाळ पासून जाणवू लागला होता. सर्वत्र
सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत होते.
या दरम्यान चक्रीवादळाच्या परिणामामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ठाणे तालुक्यात एक जणांचा मृत्यू व चार जखमी झालेत . मिरा भाईदर मध्ये एक मृत्यू झाला
असून . उल्हासनगर मध्ये एका मृत्यूची नोद झाली आहे व एक जखमी झाले आहे.
तसेच भिवंडी तालुक्यात एक घर व अंबरनाथ तालुक्यात पाच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment