ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण कार्यक्षेत्रात 09 डिसेंबर पर्यंत मनाई आदेश लागू

 ठाणे दि.11(जिमाका) :- ठाणे जिल्हयातील ग्रामीण कार्यक्षेत्रात दि.09 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 12:00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी वैदही रानडे यांनी मनाई आदेश लागू केले आहेत.

शस्त्रे, तलवारी, भाले,दंडे, सोटे, बंदूका,सुरे, लाठया अथवा काठया अथवा शारिरीक  इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे. कोणताही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा लोकांत प्रचार करणे. व्यक्तीचे प्रेत किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे. गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे.नीती यास धक्का पोहोचेल अशा किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशा प्रकारची भाषणे तत्वे, हावभाव करणे,  चिन्हे, फलक किंवा कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा लोकांत प्रचार करणे. पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे असे श्रीम. वैदही रानडे यांनी कळविले आहे.

           पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे.हा आदेश प्रेतयात्रा, लग्नाची मिरवणूक तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांच्या लेखी परवानग्या घेवून काढलेल्या मिरवणुकीस लागू असणार नाही. तसेच हा आदेश केंद्र व राज्य सरकारच्या नोकरीत असलेल्या व त्यांचे वरिष्ठांचे आदेशानुसार अगर कर्तव्याच्या किंवा अपंगत्वामुळे लाठी, काठी बाळगणे आवश्यक आहे अशांना लागू असणार नाही. असे श्रीम. वैदही रानडे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ