इयत्ता बारावीच्या परीक्षा गुणपत्रिकेसाठी विकल्प सादर करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ


ठाणे दि.18 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक फेब्रुवारी-मार्च २०२० व नोव्हेंबर-डिसेंबर २०२० परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत प्रविष्ठ झालेल्या व विकल्प सादर करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. १५ डिसेंबर, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी माहिती राज्य मंडळांचे सहायक सचिव पोपटराव महाजन यांनी कळविली आहे.

कोविडमुळे उद्भवलेली परिस्थिती व विद्यार्थी हित पाहता, विशेष बाब म्हणून विकल्प सादर करण्यास मुदत वाढ देण्यात येत आहे.फेब्रुवारी-मार्च २०२० व नोव्हेंबर-डिसेंबर २०२० परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत प्रविष्ठ झालेले विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयांशी व विभागीय मंडळांशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करावी, असे आवाहन श्री. महाजन यांनी केले  आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न