कापूरबावडी जंक्शन येथे 28 नोव्हेंबर पर्यंत मध्यरात्रीच्या काळात वाहतूक बंदी
ठाणे दि.23 (जिमाका) : ठाणे महानगरपालिकेमधील कासारवडवली वाहतूक विभागाच्या हद्दीत वडाळा ते कासारवडवली मेट्रोलाईनचे गर्डर टाकण्याच्या कामामुळे दि. 23 ते 28 नोव्हेंबर याकाळात रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करून वाहतूक वळविण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी कळविली आहे.
प्रवेश बंद - मुंबई-नाशिक
महामार्गाने माजिवाडा, कापूरबावडी घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या जड अवजड
व इतर सर्व - प्रकारच्या वाहनांना तत्त्वज्ञान विद्यापीठ, कापूरबावडी
जंक्शन येथे "प्रवेश बंद" करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग - मुंबई-नाशिक
महामार्गाने माजिवाडा, कापूरबावडी मार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी
जड अवजड वाहने ही - कापूरबावडी सर्कल येथून उजवे वळण घेवुन बाळकुम नाका, भिवंडी आग्रा रोड, कशेळी, काल्हेर, अंजुर फाटा
मार्गे किंवा माजीवाडा उड्डाणपुलाखालून यु टर्न घेवून खारेगांव ब्रिज, मानकोली नाका
मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद - मुंबई कडून कापूरबावडी जंक्शन तत्वाज्ञान विद्यापीठ मार्गे घोडबंदर रोडकडे
जाणाच्या सर्व जड अवजड वाहनांना माजीवाडा गोल्डन डाईज ब्रिज वर वाय जंक्शन येथे 'प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- सदरची जड अवजड वाहने ही नाशिक रोडने खारेगांव टोलनाका, मानकोली नाका, अंजुर फाटा
मार्गे इच्छित स्थळ जातील.
गर्डर टाकण्याचे
काम पूर्ण होईपर्यंत ही पर्यायी व्यवस्था राहणार आहे. पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडॉर, ऑक्सिजन गॅस
वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे
पोलीस उप आयुक्त बाळासाहेब पाटील
यांनी कळविले आहे.
0000000
Comments
Post a Comment