उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांची नोंदणी खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आरोग्य विभागाकडे करणे बंधनकारक

 ठाणे दि.22 (जिमाका): खाजगी क्षेत्राकडून वैद्यकीय सेवा घेणाऱ्या क्षयरुग्णांची आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालय, डॉक्टर, औषध विक्रेते यांनी जानेवारी 2021 पासून त्यांच्याकडे उपचार आणि औषधे घेणाऱ्या क्षयरुग्णांची नोंदणी जिल्हा, महानगरपालिका क्षयरोग कार्यालयात करावी, असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.गिता काकडे यांनी कळविले आहे.

          केंद्रशासनाच्या अधिसूचनेनुसार  सार्वजनिक व खाजगी रुग्णालय, वैद्यकीय व्यावसायिक, वैज्ञानिक प्रयोगशाळा, औषधविक्रेते यांच्याकडून उपचार आणि औषधे घेणाऱ्या प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद होणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील खाजगी रुग्णालय, डॉक्टर्स, औषधविक्रेते यांनी दरमहा जिल्हा, शहर क्षयरोग कार्यालयाकडे रुग्णांची नोंदणी करणे आवश्यक आहे.

            प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद होवून त्यावर उपचार करणे, क्षयरोगाचा प्रसार रोखणे यासाठी नोंदणीकरणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून क्षयरुग्णांची नोंदणी केली जाणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील करण्याची तरतूद असून जिल्ह्यातील क्षयरुग्णांची माहिती खाजगी रुग्णालये, व्यावसायिक, लॅब, औषधविक्रेते यांनी जिल्हा, शहर क्षयरोग कार्यालयाकडे करावी, असे आवाहन डॉ.काकडे यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”