अनुसूचित जाती उपयोजनेतील विकासकामांचे सुधारित प्रस्ताव तातडीने पाठवावेत - अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे


 

ठाणे, दि. 23 : जिल्हा वार्षिक योजनेच्या अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत सन 2021-22 या वर्षासाठी विकास कामांच्या निधीसाठी संबंधित विभागांनी तातडीने सुधारित प्रस्ताव पाठवावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी आज येथे दिले.

जिल्हा वार्षिक योजनेच्या अनुसूचित जाती उपयोजना 2021-22 या वर्षाच्या प्रस्तांवासंदर्भात आज श्रीमती रानडे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त बलभीम शिंदे, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी एस.एम. शेरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ए.टी. पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी सुचिता ढमाले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कीर्ती डोईजोडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सन 2021-22 या वर्षासाठीचे अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेच्या अनुसूचित जाती उपयोजनेच्या प्रस्तावांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

अनुसूचित जातील उपयोजनेचा निधी हा योग्य रितीने व लवकरात लवकर खर्च व्हावा, यासाठी विविध विकास कामांचे प्रस्ताव तांत्रिक मान्यता घेऊन पाठवावेत. यापूर्वी कमी प्रमाणात निधी देण्यात आला होता. मात्र आता मागणी केलेला संपूर्ण निधी मिळणार आहे. त्यामुळे सर्व विभागांनी सुधारित प्रस्ताव पुढील आठवड्याभरात पाठवावेत, अशा सूचनाही श्रीमती रानडे यांनी केल्या.

सहायक आयुक्त श्री. शिंदे यांनी अनुसूचित जाती उपयोजनेचा निधी व प्रस्तावांची माहिती यावेळी दिली.

00000000

 

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न