ठाणे येथे ३ डिसेंबरला पेन्शन अदालतीचे आयोजन
ठाणे, दि. २९ (जिमाका): ठाणे जिल्हा कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांसाठी मुंबई येथील महालेखापाल कार्यालयामार्फत दि. ०३ डिसेंबर २०२१ रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी राजेश भोईर यांनी दिली आहे.
जिल्हा कोषागार कार्यालय, पहिला मजला, कोर्ट नाका,
ठाणे येथे दुपारी २.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत पेन्शन अदालत होणार असून कोरोना
प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी आवश्यक असलेल्या निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन
जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांनी केले आहे. उपस्थित राहणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत आणावे,
असे आवाहनही त्यांनी केले आहे.
0000000
Comments
Post a Comment