ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात मनाई आदेश
ठाणे
दि. २२ (जिमाका) :- ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दि. 23
नोव्हेंबर २०२१ पासून पुढील आदेश होईपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहे, असे ठाणे
शहर पोलीस आयुक्त जय जीत सिंह कळविले आहे.
या काळात इंस्टाग्राम, वॉट्सअप, ट्विटर, फेसबूक इ.
समाजमाध्यमाद्वारे तसेच इतर डिजिटल ,इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांद्वारे जातीय तणाव निर्माण
करणारे संदेश, चित्र,चित्रफीत प्रसारीत व प्रसिध्द करणास मनाई करण्यात आली आहे.
समाजात चुकीची माहिती,अफवांचा जाणीवपूर्वक प्रचार
प्रसार करणे यास निर्बंध घालण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारे जातीय तणाव निर्माण
करणाऱ्या मजकुराचे फ्लेक्स बोर्डस, छापील साहित्य प्रसारित ,प्रसिध्द करणे व त्या प्रकारच्या
घोषणा देणे,पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणे, जाहिर सभा घेणे, मिरवणूका
काढणे, मोर्चे, धरणे, रॅली, निदर्शने, घोषणा-प्रतिघोषणा देणे इत्यादी आंदोलनात्मक कृत्यांना
या आदेशान्वये मनाई करण्यात आले आहे.
आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान
संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहिल, असे ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जीत सिंह
कळविले आहे.
Comments
Post a Comment