राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समिती अध्यक्षपदी सुदाम परदेशी यांची निवड
ठाणे, दि.25(जिमाका) : महाराष्ट्र राज्य राजपत्रित
अधिकारी महासंघाच्या जिल्हा समन्वय समितीच्या
ठाणे जिल्हाअध्यक्षपदी जिल्हयाचे निवासी उप जिल्हाधिकारी सुदाम परदेशी तर ठाणे जिल्हयाच्या
दुर्गा महिला मंच अध्यक्षपदी अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे यांची निवड झाल्याचे महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ग.दि.कुलथे यांनी आज येथे जाहीर
केले.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती
सभागृहामध्ये महासंघाचे संस्थापक ग.दि.कुलथे यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक झाली .बैठकीमध्ये जिल्हा कार्यकारणी जाहिर करण्यात
आली.जिल्हा समन्वय समितीच्या कार्याध्यक्षपदी अविनाश फडतरे, जिल्हा समन्वय समितीच्या
उपाध्यक्षपदी डॉ.तरुलता धानके, सचिवपदी शेषराव
बडे तर प्रसिध्दी सचिवपदी अजय जाधव यांची निवड करण्यात आली.
यावेळी कल्याण केंद्राची उभारणी, महागाई , घरभाडे,
भत्त्यात वाढ तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली.या
बैठकीस राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी समीर भाटकर, मोहन पवार, डॉ.
मनिष रेंघे, सुधाकर तावडे, डॉ.अविनाश भागवत व ठाणे जिल्हयातील सदस्य उपस्थित होते.
00000000
Comments
Post a Comment