स्वाधारगृह योजनेसाठी स्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव सादर करावे


ठाणे दि.24(जिमाका): केंद्र पुरस्कृत स्वाधार योजना अंतर्गत राज्यातील निराधार, निराश्रित, नैसगिक आपत्तीत कौटुंबिक हिंसाचारामध्ये बेघर झालेल्या महिलांसाठी नवीन स्वाधारगृह योजना  सुरु करण्यात आली आहे. त्या अंतर्गत सेवायुक्त सुविधा केंद्र चालविण्यासाठी  स्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव  सात दिवसात  सादर करावे असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी केले आहे. 

स्वाधार योजना राबविण्यासाठी संस्था अधिनियम 1861अंतर्गत नोंदणीकृत असावी.संस्थेचे स्वतंत्र घटनापत्रक व त्यात संचालक मंडळाचे अधिकारी कर्तव्ये व जबाबदारी यांचा स्पष्टपणे उल्लेख असावा. संस्था व्यक्तीच्या/संस्थेच्या वैयक्तिक फायदासाठी कार्यरत नसावी. संबंधित संस्थेस महिला कल्याण व सामाजिक क्षेत्रातील किमान 5 वर्ष काम करण्याचा अनुभव असावा. आर्थिक परिस्थिती चांगली असावी. काही कारणास्तव शासनाचे अनुदान मिळण्यास विलंब झाला तरीही स्वाधारगृहाचा खर्च करण्यास संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी. याकरीता संस्थेच्या नावे किमान रु.15 लाख 60 हजार इतकी रक्कम बॅकेत मुदत ठेव म्हणून असणे गरजेचे आहे.

            संस्थेस सामाजिक कार्याचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, संस्था त्याच जिल्ह्यातील असावी, निती आयोगाच्या पोर्टलवर नोंदणीकृत असावी. नवीन स्वाधारगृह योजना 2015 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार संस्थेकडे ३० प्रवेशितांची क्षमता असलेल्या एका स्वाधारगृहासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असावा.

अटीची पुर्तता करणाऱ्या संस्थानी प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह सात दिवसात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आवार नियोजन भवन इमारत, दुसरा मजला येथे दोन प्रतीत सादर करावा.

0000000

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न