मार्जिन मनी योजनेची 10 डिसेंबर रोजी कार्यशाळा
ठाणे,दि.07(जिमाका):केंद्र
सरकारच्या स्टॅण्ड अप इंडिया या योजनेतंर्गत
उद्योग करण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटक यांच्यासाठी मार्जिन मनी योजनची कार्यशाळा 10 डिसेंबर रोजी सकाळी
11 वाजता डॉ.व्ही.एन. बेडेकर इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज ,बिल्डिंग नं.4 जनाद्विप
चेंदणी बुंडर रोड, ठाणे पश्चिम येथे आयोजित करण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी समाज कल्याण
निरिक्षक श्री. अळकुटे यांना या
8237322630 क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन
सहायक आयुक्त समाज कल्याण श्री.बलभीम शिंदे यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment