जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी 17 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
ठाणे,दि. 07 (जिमाका): जिल्हयातील गुणवंत खेळाडू, दिव्यांग
खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो.त्यासाठी
17 डिसेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
या पुरस्कारांचे स्वरुप रोख रु. १०,०००/- स्मृतीचिन्ह
व प्रमाणपत्र असे आहे. सन २०२०-२१ मध्ये जिल्हयातील गुणवंत खेळाडू (१ महिला, १ पुरुष),
१ गुणवंत दिव्यांग खेळाडू व १ क्रीडा मार्गदर्शक यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत.
या पुरस्करासाठी अर्जदार हा महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्य करणारा असावा. हा पुरस्कार
सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या अर्जदारास देण्यात येईल.
या पुरस्कारांसाठी दि. १० डिसेंबर २०२१ पर्यंत जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय, कोर्ट नाका, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथून अर्ज
घेऊन जाणे व अर्ज परिपूर्ण भरुन दि. १७ डिसेंबर २०२१ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयात जमा करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा
अधिकारी स्नेहल साळुंके यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment