ठाणे जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 29 व 30 डिसेंबर 2021 रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा
ठाणे, दि.28
(जिमाका): ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, व जिल्हा
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील उमेदवारांसाठी
दिनांक 29 व 30 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले
आहे. असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त
कविता जावळे यांनी कळविले आहे.
उमेदवारांनी
नोंदणीसाठी www.ncs.gov.in या पोर्टलवर जॉबसिकर
म्हणून नोंदणी करावी. नंतर जॉब फेअर व इव्हेंट टॅब मधिल ऑनलाईन जॉब फेअर या टॅबवर क्लिक करावे व उपलब्ध असलेल्या
रिक्तपदाची माहिती पाहून ऑप्शनवर क्लिक करावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०२२-२५४२८३०० या दूरध्वनीवर संपर्क
साधावा,असे आवाहन श्रीमती जावळे यांनी केले आहे.
0000000
Comments
Post a Comment