डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ
ठाणे, दि.28
(जिमाका) अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यासाठी
राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यासाठी
31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली
आहे,असे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त
बलभीम शिंदे यांनी कळविले आहे.
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर केलेले नाही, अशा विद्यार्थ्यांनी शुक्रवार
दि. 31 डिसेंबर 2021 पर्यंत आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण,
ठाणे कार्यालयात सादर करावे.या योजनेअंतर्गत अर्ज भरण्याच्या मुदतवाढीबाबत प्राचार्यांनीही
संबंधीत विद्यार्थ्यांना कळवावे. मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत,असे सहायक आयुक्त
श्री. शिंदे यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment