जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 3 जानेवारी ऑनलाईन आयोजन
जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 3 जानेवारी ऑनलाईन आयोजन
ठाणे,
दि.27 (जिमाका): युवकांमध्ये एकात्मकतेची भावना जागृत करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या
माध्यमातून युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी 03 जानेवारी 2022 जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे.इच्छुकांनी
30 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन
जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे यांनी केले आहे.
युवकांच्या
कला गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी
12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सव
आयोजित केला जातो. देशभरातील जिल्हयातून युवा महोत्सवातील संघ राष्ट्रीय युवा महोत्सवात
सामील होतात.
ठाणे
जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी शाळा, महाविद्यालय, युवक मंडळे कलावंतानी
30 डिसेंबर 2021 पर्यंत आपले अर्ज
dsothane2020@gmail.com या मेलवर पाठवावे ,असे आवाहन
श्री.साळुखे यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment