गोवे ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी आचारसंहिता लागू
ठाणे दि.27 ( जिमाका) भिंवडी तालुक्यातील गोवे ग्रामपंचायतीच्या
पोटनिवडणूकी निमित्त आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.या निवडणूकीसाठी नामनिर्देशक पत्रे
स्विकारण्याची ठिकाणी 100 मीटर परिसरात राजकीय
पक्ष, संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रतिनिधी किंवा इतर व्यक्ती यांना निवडणूक
संबधी सभा,बैठका,पत्रकार परिषद घेण्यास दि.6 जानेवारी 2022 रोजी पर्यंत प्रतिबंध करण्यास आल्याचे पोलीस आयुक्त
जय जित सिंह यांनी कळविले आहे.
गोवे ग्रामपंचायत पोट निवडणुकीसाठी दिनांक 28 डिसेंबर 2021 ते दिनांक 03/01/ 2022 या कालावधीत नामनिर्देशन पत्रे मागविणे
व सादर करावयाचे आहेत. दिनांक 04/01/ 2022 रोजी सकाळी 11.00 वाजल्यापासून नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात
येणार आहे. दिनांक 06/01/2022 रोजी दुपारी
3.00 वा. पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा व दुपारी 3.00 वा. नंतर निवडणूक चिन्ह
नेमून देणे व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणार आहेत. दिनांक 18/01
/2022 रोजी मतदान होणार असुन, दिनांक 19/01/2022 रोजी मतमोजणी होणार आहे. दिनांक 24/01 /2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या
निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याची अंतिम दिनांक राहणार आहे.
निवडणूक कार्यालयाच्या 100 मीटर चहुबाजुकडील परिसरात
प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत.नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्या
उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारी
व त्याच्या सोबत दोन व्यक्ती यांनाच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षामध्ये प्रवेश
देण्यात येईल.अर्ज दाखल करण्यास येणाऱ्या उमेदवारास नमुद ठिकाणच्या कार्यालयाच्या 100
मीटर चहुबाजुकडील परिसरात फक्त तीन वाहने आणण्याची परवानगी देण्यात येत असून तीन पेक्षा
अधिक वाहने सदर कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात आणण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे.
तसेच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.
या आदेशाचे कोणीही व्यक्तीने उल्लंघन
केल्यास अशा व्यक्ती विरूध्द भारतीय दंड विधान संहिता कलम 188 अन्वये कायदेशीर कारवाई
करण्यात येईल. असे आयुक्त श्री.सिंह यांनी कळविले आहे.
00000000
Comments
Post a Comment