मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज व नुतनीकरणासाठी मुदतवाढ
ठाणे,दि.31
(जिमाका): अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज स्विकारण्यास
मुदतवाढ दिली आहे. नवीन अर्ज करणाऱ्यांनी दि. 9 जानेवारी 2022 पर्यंत तर नुतनीकरण करणाऱ्या
विद्यार्थ्यांना 4 जानेवारी 2022 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर
(http://mahadbtmahait.gov.in) अर्ज करता येणार असल्याचे सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक
आयुक्त बलभीम शिंदे यांनी सांगितले आहे.
राज्य
शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर
अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 2020-21 व 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता
अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय
व विशेष सहाय्य विभाग व इमाव बहुजन कल्याण विभागामार्फत विविध शिष्यवृत्ती व फ्रि शिप
या योजनांकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करावेत. त्यानंतर हे अर्ज संबंधित महाविद्यालयाकडून
तपासून व पडताळणी करून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण या कार्यालयाकडे सादर करावेत, असे
आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.
0000000
Comments
Post a Comment