स्वातंत्र्याचा का अमृत महोत्सवातंर्गत विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे कथन शहापूर आणि मुरबाडमध्ये 28 व 29 जुलै रोजी ‘उज्वल भारत-उज्वल भविष्य’ महोत्सव
ठाणे, दि. 26 (जिमाका) :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय तसेच नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि महाराष्ट्रातील महावितरण, महानिर्मिती, महापारे
शहापूरमधील ठाणे जिल्हा महाराष्ट्रीय वैश्य समाज संघाच्या वि. वि. भोपतराव वैश्य समाज हॉलमध्ये 28 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तसेच आणि मुरबाड तालुक्यातील ओजिवले (धसई) मधील सिद्धीविनायक मंगल कार्यालयात 29 जुलै रोजी सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमाला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी) डॉ. रुपाली सातपुते, महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे, पॉवर सिस्टिम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक वेलुरी बालाजी, महावितरणच्या कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक उर्जा विकास कार्यक्रम, सौभाग्य योजना, कुसूम योजना, राज्य शासनाच्या कृषिपंप वीज जोडणी धोरण-2020, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजना, विलासराव देशमुख अभय योजना, मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना, कृषिपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे जोडणी, इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा आदी योजनांमधून वैयक्तिक अथवा सार्वजनिक सुविधांचा लाभ मिळालेले लाभार्थी या कार्यक्रमात उपस्थित राहून आपले अनुभव कथन करणार आहेत. तसेच या योजनांच्या यशस्वितेबाबत ध्वनिचित्रफितीद्वारे माहिती सादर करण्यात येणार आहे. पथनाट्य, नाटक आदी कार्यक्रमांचेही आयोजन यावेळी करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थि
Comments
Post a Comment